काही कथा ! -10


काही कथा ! -10

नेटवर वाचलेल्या काही प्रेरणा देणारया , नितिकथा तुमच्यासाठी !





मध्यंतरी शीतपेये विकणाऱ्या एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘सीईओ’पदी एका भारतीय महिलेची निवड झाली. 

तिला पत्रकारांनी प्रश्‍न विचारला: ‘‘तुम्ही भारतीय आहात. भारताविषयी काय वाटतं?’’ 

ती चटकन म्हणाली: ‘‘यू नो...इंडिया इज बिग मार्केट...’’

उत्तर ऐकून खूप वाईट वाटलं होतं. प्रत्येकाला विकासाचं, स्थलांतराचं स्वातंत्र्य आहेच. ते टिकलंच पाहिजे; पण ते उपभोगताना आपला देश भंगारातला तुकडा व्हायला पाहिजे, असं काही नाहीय... 






टीव्ही नुकताच रुजू होत होता, तेव्हा ‘सकाळ’नं एक व्यापक सर्वेक्षण केलं होतं. 
लहान मुलांसाठी एक प्रश्‍न विचारला होता:

‘‘आपली आई कशी असावी, असं तुम्हाला वाटतंय?’’ 

बहुसंख्य पोरांनी उत्तर दिलं होतं:
‘‘टीव्हीवर धुण्या-भांड्याचा साबण विकणाऱ्या सुंदर बाईसारखी...’’



 


एका आखाती देशाची राणी माझी मैत्रीण होती. ती खूप सुस्वभावी होती; पण तिची सल्लागार अतिशय उर्मट व अरेरावी करणारी होती. अरब देशात सर्वच राजे-राण्या आपले सल्लागार युरोपातून व अमेरिकेतून आणतात. त्यांना मोठा पगार, प्रशस्त हवेल्या व आभाळाएवढं महत्त्व देतात. त्यामुळं अनेकदा स्वतः शेख, राजा, राणी हे चांगले असतात; परंतु त्यांचा चांगुलपणा लोकांना माहीत होत नाही. 

त्या सल्लागार महिलेला तीन पुत्र होते. त्यांची वयं १४, १६ व १८ वर्षं. तिघंही शाळेत जायचे. प्रत्येकाकडं मर्सिडीज होती. मुलं तर आईपेक्षा वस्ताद. आखातातल्या तेलाच्या सगळ्या खाणी आपल्याच मालकीच्या आहेत, अशा थाटात ती वागत असत.


एके दिवशी दुपारी मला फोन आला. पलीकडून फोन करणारा म्हणाला ः ‘‘एक दुःखद  बातमी आहे. राणीसाहेबांच्या सल्लागार महिलेचं तिन्ही पुत्र एकाच फटक्‍यात ठार झाले.’’ 


तर वाचाच बंद झाली. मी थोड्या वेळानं स्वतःला सावरलं व विचारलं ः ‘‘नेमकं काय झालं?’’ 

पलीकडून बोलणारी व्यक्ती म्हणाली ‘‘दुपारी तिघांनी आपापली मर्सिडीज काढली व कमाल मर्यादेच्या बाहेर जाऊन गाड्या एकमेकींवर आदळण्याचा खेळ सुरू केला. नोकरांनी आईला ऑफिसमध्ये फोन करून कळवलं, तर तिनं नोकरांनाच दटावलं. मर्सिडीज गाडी दणकट असल्यानं गाड्यांना फार काही झालं नाही. मुलांना चेव आला व शेवटी त्यांनी कल्पनेच्या पलीकडं जाऊन गाड्यांमध्ये काय केलं ते कळलं नाही; पण तिन्ही गाड्या एकमेकींवर आदळल्या व तिन्ही भाऊ जागच्या जागीच ठार झाले.’’
http://tinyurl.com/zahm495



 


रशियाचं सोव्हिएत युनियन असताना त्याचा सर्वेसर्वा असलेल्या स्टॅलिननं पुष्कळ जुलूम केले. विरोधकांचं शिरकाण केलं; पण त्याच्या हयातीत त्याला उलट बोलायला कुणी धजत नव्हते. 

पुढं क्रुश्‍चॉव्हची राजवट आली, तेव्हा त्यानं स्टॅलिनच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला. 

त्याच्या भाषणानंतर ‘श्रोत्यांचा प्रतिसाद यावा’ असं आवाहन त्यानं केलं, तेव्हा एका चिटोरीवर लिहिलेला एक निनावी प्रश्‍न त्याच्याकडं आला. त्यानं तो जाहीरपणे वाचला. 

तो प्रश्न असा होता: ‘जेव्हा स्टॅलिन हे सगळे जुलूम करत होता, तेव्हा त्याला तुम्हा लोकांनी विरोध का नाही केला? तुम्ही गप्प का राहिलात?’ 

स्टॅलिनच्या सहकाऱ्यांत क्रुश्‍चॉव्ह असल्यानं हा विचारला गेलेला प्रश्‍न बरोबर होता. हा प्रश्न वाचून झाल्यावर क्रुश्‍चॉव्हनं विचारलं  ‘‘ज्या व्यक्तीनं हा प्रश्‍न विचारलेला आहे, ती हात वर करेल का?’’ 

सभेत शांतता होती; पण कुणीच हात वर केला नाही, तेव्हा स्मित करत क्रुश्‍चॉव्ह म्हणाला: ‘‘आता तुम्हाला उत्तर मिळालं ना?’’

http://goo.gl/AaRlXi







एकदा प्रख्यात शास्त्रज्ञ हिल्बर्ट यांची भेट घेण्याची संधी उष्मागतिकीशास्त्रात महत्त्वाचा शोध लावणाऱ्या नर्न्स्ट यांना मिळाली. 

हिल्बर्ट आता वृद्ध होत चालले होते. ते बोलता बोलता म्हणाले ः ‘‘म्हातारपणामुळं माझी कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.’’

‘‘असं का?’’ नर्न्स्ट साहेब उद्‌गारले: ‘‘माझा अनुभव वेगळाच आहे. माझी कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत आहे.’’

‘‘तसं असेल तर एक दिवस असाही येईल, जेव्हा तुम्ही माझ्याइतके कार्यक्षम व्हाल.’’ 

हिल्बर्ट यांनी नर्न्स्ट यांना शांतपणे हरभऱ्याच्या झाडावरून खाली ओढलं !

http://tinyurl.com/hhohp8h





No comments:

Post a Comment

Thank you for visiting !