Vivid Konkan - II

कोकणाच सौंदर्य आहे तेथील मातीत, तेथील निसर्गात, तेथील माणसात. उतरत्या छपरांची, लाल दगडांची  कौलारू घर, बाजूला लहानशी शेती , हौसे पोटी लावलेली काही फुलझाड असं एकंदर कोणत्याही खेड्यातील चित्र . पावसाळया पुरतं सर्व बदलतं, बहुतेक करून वातावरणामुळे किंवा कदाचित घरी येऊ घातलेल्या सुबत्तेच्या चाहुलीमुळे.  दिवसभर कष्ट करून निवांत वेळ मिळतो तो संध्याकाळी. संध्याकाळ  झाल्यावर सर्व काही शांत शांत.  

आडगावमध्ये दूरदर्शन पोचलाय, पण अजून गरज बनलेलं नाहीयेय. म्हातारे कोतारे टीव्ही बघतात, पण त्यातलं त्यांना काही कळत नसत. लक्ष्या - अशोक सराफ सारखी काही नावं सोडली तर बाकी सगळी त्यांच्यासाठी केवळ माणसं.  नाटकावर मात्र अतिशय प्रेम. अजूनही गावातल्या माणसांनी मिळून वर्षाकाठी एक तरी नाटक बसवलं जातं, केवळ या प्रेमापोटी. नटी  मात्र बाहेरची असते, कारण गावात मिळत नाही म्हणून. ती इम्पोर्ट केली जाते मुंबईवरून, आणि त्या नटीला बघायलाच गर्दी जास्त. इतर पात्रांनी काम कसं वाईट केलं यावर जास्त चर्चा घडेल, पण नटी बद्दल सहसा कुणी बोललेलं मला आठवत नाही. बोललेच तर त्यात पैसे फुकट गेल्याचा पश्चात्ताप.

A still from Dashavatar (Photocredit: G M Kale)
सिंधुदुर्गात सुद्धा नाटक परंपरा आहे, तिथे प्राधान्य आहे ते दशावताराला. बापडेच बायांच काम करत असल्याने तिथे काही प्रश्नच नाही. हि दशावताराची नाटकं होतात एखाद्या 'कुणग्यात' (शेत लावला जाणारा चौकोन ), एखाद्या उतरंड असलेल्या शेतात. साध्याश्या बांधलेल्या स्टेजवर रात्री दहाच्या सुमारास नांदीने सुरु झालेला प्रयोग सकाळी संधी प्रकाश पडला की आवरता घेतला जातो. लहानपणी बघितलेली नाटकं आठवत नाहीत, पण अनुषन्गान घडलेल्या आठवणी मात्र तशाच आहेत. असो , विषयांतर खूप झाल :-)



A male playing female character in the Dashaavataar (Photocredit: G M Kale)

'चाफ़ेड ' गावात रपेट मारायला गेल्यावर मधेच पावसाची रिमझिम सुरु झाली. माझी मला काळजी नसली तरी कॅमेराची नक्कीच होती. तेथील जवळच्याच एका शेडमध्ये घुसलो. तिथून कोकणातला पाउस डोळे भरून पाहला व चित्रबद्ध केला. लोक म्हणतात फोटो घेण्यापेक्षा डोळे भरून पहा. कॅमेरा हातात असेल तर समोर फक्त बघत रहाणं मला मुळीच जमत नाही. दोन मिनिटं शांततेत घालवल्यावर आपसूक हात कॅमेऱ्याकडे वळले. समोरच्या पावसाचा एक video घेतला तोही इथे देत आहे. पाउस थोडा कमी होताच निघालो आणी दोन पावलं चाललो नसेल तेवढ्यात लक्ष एका गोठयाकडे गेलं. गाई -  म्हशी  बांधण्यासाठी  गवताने शाकारलेली झोपडीच होती ती. उतरत्या छपराच्या गवताच्या काड्यांवरुन ओघळणारे थेंब कैद करावं वाटलं नाही तर नवलच. एका पाठोपाठ एक जणु रांग लावल्यासारखे ते काडीवरुन घरंगळत खाली होते. घसरगुंडीवर खेळताना मुलं  करतात तशी.

वातावरण पावसाळी असल्याने प्रकाश फार कमी होता. फोटो काळपट येण्याचा धोका होता व माझ्याकडे Tripod नव्हता. अशावेळी मला आवडणारा प्रकार - HDR म्हणजेच 'हाय डायनामीक रेंज ' वापरून मी फोटो काढायला सुरुवात केली. या प्रकारात एका वेळी ३ वेगवेगळ्या Exposure ला  फोटो घेतले जातात व नंतर  ते कॉम्प्युटर वर एकत्र केले जातात.


मी फिरत होतो त्या भागात खैराची झाड खुप. कुणी  मुद्दामहून लागवड करत नाही, आपणहून ही झाड उगवतात व नीट लक्ष दिलं नाही तर थोड्याच दिवसात जंगल बनवतात. हा कात फार उपयोगी आहे. जखम  झाल्यावर काताची पावडर व रुईचा चिक जखमेवर टाकल्यास दोन दिवसात जखम बरी होते. हे मिश्रण लावल्यावर पाणी जखमेत जात नाही हा अजून एक फ़ायदा.  लागवड वा संगोपनासाठी फारसे कष्ट  नसल्याने पडिक जमिनीत उगवलेली खैराची झाडं तेवढी राखली जातात . हा भाग करावर तोडणीसाठी दिला जातो. तेवढाच उत्पन्नाला हातभार. 


श्रावण जवळ आला होता म्हणून की काय, उन पावसाचा खेळ कायम चालू होता. अशा वेळी मी माझी छत्री घेऊनच बाहेर पडलो होतो. एका वेळी दोन माणसं सहज मावतील एवढी  मोठी व दणकट, वारयाला सुद्धा न जुमानणारी.  पण कोकणातला पाऊस भरात असतांना मात्र कशालाच जुमानत नाही. मुक्तपणे भिजत जावं अशीच त्याची इतरांकडून अपेक्षा !




2 comments:

  1. Nice clicks
    What is season for drama or "dashavatar"?
    I havnt seen dashavatar. Do you have any click?
    Any info about "kalagitura", "naman" etc.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Suraj. Right now I dont have any photo of Dashavatar. I will add it ASAP along with other info u have asked for.

      Delete

Thank you for visiting !