सहल


सहल 




आज या वाटेवर भेटली सहेली 
बहरीत फुलांची सहल चालली  !


उघड्या माळावर, तृण फुलांच्या साक्षीने 
धरीत्रीच्या मंदगतीने, छेडिली कुसुमावतीने. 
बहरीत फुलांची सहल चालली !


हात कटीवरी, गुंजन या गाली 
वारा साथ देई, स्पर्श मलमली. 
बहरीत फुलांची सहल चालली  !

नकोच तू पुसू काही एकले मी चोरुनी 
गात गीत रंगुनी, सुखावलो मनी. 
बहरीत फुलांची सहल चालली  !

Read my more poems here.

- Paresh Kale



Image: 'Sonaki' flowers at Kaas Plateau near Satara, Maharashtra












No comments:

Post a Comment

Thank you for visiting !