चार ओळी तुझ्यासाठी : तू सोडून जाताना !



चार ओळी तुझ्यासाठी : तू सोडून जाताना !



मराठी ऋतु सहा असले तरी 
माझ्या प्रेमात ते दोनच आहेत !
तू जाशील तेव्हा ग्रीष्म तर 
येशील तेव्हा वसंत आहे !





तू जवळ असलीस की,
जग कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं !
तू निघून गेलीस की,
हेच जग मला खायला उठतं !





आता मी तुझी राहिले नाही,
किती सहजपणे म्हटलस 
एखाद्या चलाख नेत्याप्रमाणे 
 सुरेख दलबदल केलास !




जगाचा विसर पडावा अशीच होतीस तू !
आता मला विसर पडलाय तुझा. 
जाता जाता तूच शिकवून गेलीस 
म्हणून जगतोय फक्त मी माझा !


By Paresh Kale

Image source:  http://emostar.deviantart.com/art/the-tear-child-8061073








No comments:

Post a Comment

Thank you for visiting !