माझी कणेकरी


माझी कणेकरी 


एक गोष्ट पहिल्यांदाच क्लिअर करतो की हा अशा प्रकारचा ( म्हणजे मी कुणाची (ही) स्टाइल ढापून लिहिलेला , थोडक्यात मी genuine लिहितो ) पहिलाच लेख आहे तरी उगाचच आपली मुक्ताफ़ळ यावर उधळु नयेत. आणि हे मान्य करतो की आयुर्विमा , सचिन (सुनील गावस्कर निवृत्त झाल्याने) , लता व महामहिम शिरीष काणेकर याना पर्याय नाही.

तसेच लेखक समजदार असल्याने त्याने क्रिकेट , चित्रपट असे चघळलेले विषय न घेता परंतु कुणीही कितीही बोलू शकेल असा विषय घेतलाय --- मुली व बायका ( हाय काय बिशाद आहे बोलायची) .... बघा समोर ही नाही तर मागुनहीं बोलू शकत नाही तुम्ही ? ( हा शब्द आपण असा वाचावा ) ...
इथे मी काही टिप्स देणार आहे त्या तुम्हाला ( खचितच ) उपयोगी पडतील :

१. मुलींचे आवडते विषय जाणुन घ्या --- त्यांच्याशी बोलताना त्यांच्या भूतकाळा विषयी शक्यतो बोलू नका... त्याना आवडत नाही ...मुलीना भूतकाळ नसतो... म्हणुनच त्यांचे वय भराभर वाढत नाही .... जर ती काकुबाई असेल तर flirting म्हणजे नेक्स्ट टू महापाप आहे ही वाक़ये उपयोगी पडतील.

२. मुलीना सामान्यपणे चौकलेट , गणपती , गुलाबी रंग , रुत्विक / शाहरुख , आइसक्रीम या गोष्टी आवडतात ( यात काय विशेष नविन सांगितलंत ? कबुल आहे माझे वाचक एवढे हुशार आहेत हे मला माहीत आहे ...) सांगायची गोष्ट ही की याचा उपयोग फक्त गिफ्ट देण्याकरता नव्हे तर बोलताना पेरणी करण्याकरता होऊ शकेल. उदा. हळूच माहीत करुन घ्या शाहरुख का रुत्विक ... मग झाल रुत्विक आवडला तर शाहरुखला कसला डान्स येतोय ? म्हणा...बघा काय मजा होते ती... यापाठी लॉजिक अस आहे की जनरली एक आवडत असेल तर दूसरा आवडण्याची  शक्यता कमी ... अर्थात दोन्ही आवडण्याची पण शक्यता असल्याने कमेन्ट करताना सावध....

३. जर तुम्ही बाइक वापरत असल तर रस्त्यातून जाताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ... एखादी मुलगी / बाई गाडी चुकीची चालवत असेल तर तिला काहीही बोलू नका ...तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते ..... याच कारण आहे त्यांची समजूत ...अखिल रस्ता महामन्डळ हे त्यांच्या घरचे / माहेरचे आहे व तिचे वडिल (तुमच नशीब फ़ळफ़ळल तर तुमच्या सासरयाचे ) आहे. लग्न झाल्यावर ते रुखावताबरोबर आलेल आहे असच वाटत असत त्याना.

ट्रिंग ... ट्रिंग....

गर्ल फ्रेंड चा कॉल दिसतोय ...

बाकीच्या टिप्स पुढल्या वेळेस !


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !