slots.us.org The Top Post !

चित्र
चित्र

जर सोपं असलं असतं तर,
तुझं एक चित्र बनवलं असतं.
ज्या घरात येणार नाहीस कधी,
त्या भिंतीवर सजवलं असतं.


दिवस, तुझ्याकडे बघून गेला असता,
तुझा वावर घरभर असला असता.
संवाद आपला दिवसभर झाला असता,
दुखावणारा काळ थोडा सुखावला असता.किती झालं तरी, जखमा मात्र भरल्या नसत्या.
शेवटी चित्रच ते, त्याला जिवंत भावना नसत्या !एकांतएकांत 


शांत नीज मिठीत
डोळ्यात जाग कशाला ?

उद्याच्या सुखांचा,
आज हव्यास कशाला ?प्रेममय काळ आहे,
त्याची चिंता कशाला ?

तुझ्या माझ्यात दुःखाचा,
अडसर कशाला ?
मेघदूतमेघदूत

हा सह्याद्री  नसता तर,
कदाचित वारे देशावर पोचले असते !
या ढगांनी माझे विचार,
तुझ्या अंगणात ओतले असते .